POEM-divalichi pahili pahat

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

POEM-divalichi pahili pahat

JAYANT GORE
दिवाळीची पहिली पहाट :-

पहाटे पहाटे अभ्यंग स्नान
 त्यावर सुगंधी उटण्याचे वाण
मंद पणत्यांनी सजलंय अंगण
अन खमंग फराळाचे आंदण !!

फुलबाज्यांचं मोहक लाजण
 फटाक्यांच दणादण फुटण
आपटबारांच जोरात आपटण
भुईनळ्यांच रंगीत उडण !!

सप्तरंगी बाणांच झेपावण
 लवंगींच फुसक फुसकण
माहेरवाशणीच माहेरपण
अन जावयाचा दिवाळसण !!

सारं कसं आनंदमय
 सारं कसं आल्हाददायक
सारं कसं उल्हासवर्धक
वातावरण सगळं तेजोमय !!-जयंत