POEM-OZE

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

POEM-OZE

JAYANT GORE
ओझे:-
काळ्या ढगांना ओझे झाले थेंबांचे
सहन न होऊन झाले रुपांतर वर्षावाचे !!
गरिबांना ओझे झाले उपकारांचे
विचारांचे काहूर माजले परतफेडीचे !!
अबलेला ओझे जाहले अत्याचारांचे
सहन न होऊन विचार आले आत्महत्येचे !!
गरजूंना ओझे जाहले लाच देण्याचे
सहन न होऊन सहाय्य घेतले पोलिसांचे !!
उपवर वधूला जाहले ओझे प्रेम कटाक्क्षांचे
आनंद जाहला स्वातंत्र्य मिळाले निवडीचे !!
कवितेला ओझे जाहले शब्दभावनांचे
सहन न होऊन रुपांतर जाहले शेवटाचे !!-जयंत