PAWUSALI

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

PAWUSALI

Vishal Kavi
हि बहार का आली
अवचित अशी फुलून
का वेङावल्या या सरी
गुलाबही लाली ल्येवुन

आली आली आली
रिमझिम सर हि बरसली
मेघ दाटले आभाळात
प्रीती अंकुरे उरात
तुझे माझ्या संगयेणेँ
तुझेच विचार मनी रुंजणे
या अकल्पितास कारणीभूत

हि बहार का आली फुले
गुलाबही लाली ल्येवुन . . .

छन छन छुम छुम
छनन छुम छनन छुम . .
पायलांची तुझ्या कानी
येई छुमछुम अशी . . .
जमिनीवर कोसळता
खळखळत्या पाऊस सरी . . .
बघ ना ती आनंदून जायी
चिवचिव करते चिऊताई
तु कोसळता गं सये
बीज आनंदाचे रुजुनी येई

हि बहार का आली
धुंदी गेली पसरुन . . .
का वेङावल्या सरी
शिङकले प्राजक्तचे अंथरुन

हि बहार का आली फुले
गुलाबही लाली ल्येवुन . .

सरसर झरझर सरसर झरझर
तु अशी जेव्हा बरसली
बळीराजाची कळी तेव्हा
आनंदाने खुलली
भुसभुशीत केली जमिन त्याने
लुसलुसली काळी माती . .

त्यात इवली इवली रोपे रोवली . .
पेरली कोणी मूळे आणि कंद
बांधले कुणी कलम ही
जगु लागला तो स्वच्छंदी
आता तु मात्र मुक्तपणे
सुखाची नांदी घेवून
शैलधारेत कोसळही

हि बहार का आली
मोहूनी गेली हिवराई
कधी कोवळ्या ऊन्हाने
वेधते जीवा शेवंती

हि बहार का आली फुले
गुलाबही लाली ल्येवुन

ऋतु वसंत ग तुझा
मना चिँबव भिजवही
ओल ओलीने अंग न्हावूदे
मनभर आता शब्दांचा
झिम्माङ मारा होवू दे
नव्या नव्या कल्पनांचा
काव्यमाळ ओवू दे

हि बहार का आली
हासुन उमले चांदणी
चंद्र ही लाजला नभी
चोरुन पाहतो ढगांआङूनी
आकाशात निरभ्र राती
शशी ज्योत्सनेत विरघळती

हि बहार का आली फुले
गुलाबही लाली ल्येवुन