New poem

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

New poem

Kiran Kshirsagar
विस्तीर्ण आकाशाखाली
झोपलो मी निवांत
सोबतीला माझ्या होत्या
शुभ्र चांदण्या अनंत

मंद गार वा-याच्या झुळका
करित होत्या अल्हाद तनाला
विचारांचे ओझे उतरवुन
अलगद केले शांत मनाला

रातराणी बहरली छान
सुगंध दरवळला अंगणात
हरवली होती झोप कधीची
विरहाच्या त्या काळोखात

आज पुन्हा लाभली सुखाने
सुगंधी गारव्यात आणि
शुभ्र चांदण्याच्या नभात
शुभ्र चांदण्याच्या नभात.

               किरण क्षीरसागर.