|
काल परवा इथसा नोता पलला पाउस
पुर नदीच्या डोळ्यात कोण रडला पाउस .......
कड़ी थाम्बू थाम्बू आला कवा वादय वार्यान
जीव अदमुसा होए तुह्या टपोर्या मार्यान....
भुई संग अभायाची पिरतिनी गाठभेट
भर पाण्या पावसात बिलगे पानाले देठ....
आल्या पावसाच्या सरी तसी फुलारली माती
तुह्या मह्या वालाव्यान नवी कुबारली नाती.....
उग्यामुग्या वावरातकेलि पाखरं न बोम्ब
रन कौतुकले सारे माती वाधातले
|