Kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita

Kasturimitra

शामसांज घन सुंदर सुंदर अतीव प्रिय भासे तो शामसुंदर मनी नाचे

लोभस वेणू स्वर स्वर अंतरीचा ठाव घेऊन त्रिलोकीचे दुःख हरण्या वाजे

वर्ण कपिल गोधन गोधन उधळुनिया धूळ शाम रंगी रंगवून वाट अतिवसुंदर भासे

एकलाच या भूमीवर अमर्त्य अमर्त्य धावत कपात अंतर संकट समयी नवा मार्ग दाखवे

नाव त्याचे चोर चोर गोकुळीचा प्रियजन ईश्वर तो एकला नास्तिक म्हणून सांगे

सांगूनिया गुपित गुपित जगण्याचे झाला कधीच परी त्याची मोड उकल कोण कशी जुळवे

असा हा प्रेम वाटीत वाटीत सुख वेचिता दुःख हरत उभा राहिला मागे

काव्य त्याचे रचित रचित नभेटती शब्द अधिक महाकाव्य नाही त्यासी पुरवे     


             प्रणव प्रभू