Kavita

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita

Kasturimitra

सुखाच्या सागरात हरवण्याआधी किनाऱ्यावरील पत्थरांचे दुःख सहन करावे लागते
जगण्यातील मजा शोधण्यासाठी पहिले जगून बघावे  लागते


जीवनात असणे अन हसणे हे फारच महत्वाचे असते
असण्यातून हसणे अन हसण्यातून असणे यातूनच जगणे सजते


आनंदाचाही कहर दुःखाच्या वेशीपर्यंत नेहून सोडतो
कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी दुःखाचा गाव पटकन दिसतो


एखाद्याशी जुळणं अन एखादा कळणं यातही खूप मजा आहे
जुळणाऱ्याला कधी कळत नाही अन कळणाऱ्याशी कधी जुळत नाही


कस जगावं याचा जितका शोध घ्यावा तितका अर्थ गहिरा दिसतो
प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा त्रास तसा कमीच असतो 


          प्रणव प्रभू
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Kavita

Siddheshwar Vilas Patankar
वाः मित्रा काय सुंदर कविता आहे यार . फक्त शेवट खटकला . शेवटचं वाक्य ते प्रवासाविरुद्ध पोहोण्याचा त्रास तसा जास्त असतो असं पाहिजे होतं . सुंदर कविता आहे . परत ये माघारी . कट्टा वाट पाहत आहे तुझी आणि तुझ्या कवितांची .

सिद्धेश्वर पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Kavita

Ankita patil
In reply to this post by Kasturimitra
agdi vastvikta aahe kavitet...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Kavita

Nikita
In reply to this post by Kasturimitra
Nice poem....mast ch