Kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita

Kasturimitra
कधीतरी काहीतरी हरल्यासारखं वाटतं
कधीतरी काहीतरी जिंकल्यासारखं वाटतं
कधीतरी काहीतरी विसरल्यासारखं वाटतं
कधीतरी काहीतरी लक्षात आल्यासारखं वाटतं
तेव्हाच गावातल्या घरी जावसं वाटतं


कधीतरी गर्दीत हरवल्यासारखं वाटतं
कधीतरी एकट असल्यासारखं वाटतं
कधीतरी रस्ता चुकल्यासारखं वाटतं
कधीतरी वाट मिळाल्यासारखं वाटतं
तेव्हा गावातल्या घरात पोचल्यासारखं वाटतं


कधीतरी कोणीतरी चुकल्यासारखं वाटतं
कधीतरी कोणीतरी रुसल्यासारखं वाटतं
कधीतरी कोणीतरी रडल्यासारखं वाटतं
कधीतरी कोणीतरी हसल्यासारखं वाटतं
तेव्हा गावातल्या घरात बसल्यासारखं वाटतंकधीतरी आपलं कोणीतरी हरवल्यासारखं वाटतं
कधीतरी आपलं कोणीतरी भेटल्यासारखं वाटतं
कधीतरी माणुसकी नसल्यासारखं वाटतं
कधीतरी माणूस समजल्यासारखं वाटतं
तेव्हा गावातलं कोणीतरी दिसल्यासारखं वाटतं


कधीतरी अधुर राहिल्यासारखं वाटतं
कधीतरी पूर्णत्व मिळाल्यासारखं वाटतं
कधीतरी आपणच आपल्यापासून दुरावल्यासारखं वाटतं
कधीतरी आपणच आपल्याला मिळाल्यासारखं वाटतं
तेव्हा गाव कधीच सोडू नये अस वाटतं

            प्रणव प्रभू