Kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita

Kasturimitra


त्या आडवळणाच्या वाटेवरून चालताना
तुला कधीतरी माझी आठवण येईल
तेव्हा परत मागे वळून बघू नकोस
कारण पुन्हा ती आठवण तुला
माझ्याजवळ आणून सोडेल


क्षणभर विश्रांतीसाठी थांबवस वाटेल तुला तेव्हा मात्र जरूर थांब
त्या एकांतात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न कर
कारण एकांतातच आपल्याला कळत आपण आपल्या किती जवळ आहोत आणि किती लांब


आपल्या दोघांच्याहि वाटा समांतरच होत्या अस तुला जेव्हा वाटेल
तेव्हा वाट बदलण्याचा विचारही करू नकोस
कारण काय माहित या दोन विभागलेल्या वाटांना कधीतरी एकत्रही यावस वाटेल

        प्रणव प्रभू