Kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita

Kasturimitra

एखादं पुस्तक वाचताना अचानक एखादा शब्द डोळ्याखालून निघून जावा
कधीतरी पुस्तकावर बोलताना संदर्भासाठी त्याच शब्दाचा उपयोग व्हावा


शब्दांचा खेळ हा असा काही चालू असतो
ठरवून खेळायचं म्हटलं तर शब्द ऐनवेळी रुसून बसतो


शब्दच काहीवेळ सुर्यासारखे प्रखर उष्ण होतात
अशाच वेळी चंद्राचा शीतल प्रकाश शब्दच निर्माण करतात


शब्दांचे कोष उलघडताच नवीन धाग्यांचा जन्म होतो
शब्दांच्याच गुंत्यामधून रेशमी बंध तयार होतो


आयुष्याच्या अखेरीस डोळ्याखालून निसटलेलेच शब्द स्मरणात राहतात
असेच काही शब्द शेवटी जगण्यास भाग पाडतात          प्रणव प्रभू