Kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita

Kasturimitra

मेघांच्या काळ्याभोर नक्षीतुनी शीतल वाऱ्याच्या झुळुकेसवे येणारा पाण्याचा एक थेंब अंगावर झेलताना जीव भांड्यात पडतो
हि अशी भेट कधी कशी केव्हा कुठे घडेल हा प्रश्न चातकाच्याहि आधी काळजात कालवा कालव करतो


पाणी या शब्दाचा शोध घेता याला जीवनच का म्हणतात याचा अर्थ त्याचा स्पर्श अनुभवल्याशिवाय लागत नाही
बोलीभाषेप्रमाणे  बदललेला उच्चार असो वा स्वर हा जीवाला लागलेली तगमग हि पाण्याचीच आहे हे लपवून ठेऊ शकत नाही


भावनेच्या हेलकाव्यातून शब्दसंगती करत प्रत्येक वाक्यासारशी डोळ्यातून नितळ प्रेमाचा पाझर फोडण्याचा हक्क त्यानेच अजून अबाधीत ठेवला आहे
हुंदक्यासरशी बदलणाऱ्या कंठाच्या हालचालीवरून मनाचे कुंपण तोडत हृदयाशी सलगी करत गालावरून ओसंडून वाहणारा पाण्याचा प्रवाह तसे विसरणे कठीण आहे


पाण्याचा एक थेंब जगासमोर आणण्याचे स्रोत वेगळे असले तरी त्यातील असलेला आपलेपणा अन निरागस निस्वार्थी प्रेम हे मात्र कधीच कमी होत नाही
आपण कितीही खालच्या पातळीला जाऊन या एका थेंबाचा निर्मितीचा शोध घेतला तरी तो पाण्याचा एक थेंब आपली पातळी कधीच सोडत नाही
             प्रणव प्रभू