Kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita

Kasturimitra

लख लख चांदण्यांचा मैफिलीत साजणी तुझा स्पर्श मिळू दे
ओठातील शब्दांचा अर्थ मनीच्या कुंपणात शिरू दे


बोल बोबडे ऐकताना हसण्याचे तुषार चौफेर बरसून उधळावे असे स्वप्न सांजवेळी खिळावे
चाहूल लागण्या आधीच स्पर्श हृदयाच्या अंगणी येऊन बहरावे


रुसवा पाहून मनवायचा हा हट्ट अनावर होण्याइतकी लोभस दशा या डोळ्यातुनी दिसावी
साजणी सोबत तुझी या चांदराती चांद्रचुऱ्यात मिसळावी


तिमिराने तेजातुनी असे प्रेम लहरीतुनी स्पंद सारे उसळूनी तेजोकिराणे रात्रीस या फुसावे
स्वप्न संपण्या आधी सत्यानेही असत्यकडे पाठ फिरवूनी बसावे


घोर लागण्या इतुके बंध प्रीतीच्या जाळ्यातूनी बहू तरल प्रेम तनास आठवी
साथीचा क्षण तो भास्कराच्या प्रकाशास येन रजनीच्या त्याग करण्यास पाठवी


इतुके आंदण मागण्या आधी या सलगीतुनी शोधाता तुझे प्रेम कळू दे
जगणे कसे कळण्या आधी या स्पर्शाला
अंतरीचा ठाव लागू दे
अंतरीचा ठाव लागू दे


                  प्रणव प्रभू