Kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita

Kasturimitra
आज कोऱ्या कागदावर अक्षरांची पंगत बसवण्याआधी  शब्दांच्या अस्तिवाची भीती वाटू लागली
कागदाच्या आयुष्याचा शेवट हा रद्दीत नाहीतर चुलीत होऊ शकतो हे समजताच शब्दांची काळजी वाटू लागली


एखाद्या शब्दाचा जन्म होण्याआधी भावनांच्या हजारो योनीमधून घडणारा प्रवास समोर आला
प्रत्येक भावने गणिक एकाच शब्दाचा बदलणार अर्थ तेव्हाच लक्षात आला


एखादा हसवणारा शब्द कधी रडवू लागला तर त्याची व्याख्या बदलत जाते
तरीही जीवनाचे गणित मांडण्यासाठी आकड्यांऐवजी शब्दांचीच निवड केली जाते


कधीतरी या अबोल निरागस शब्दांची कीव वाटण्या एवढे प्रसंग उद्भवू लागतात
कोरडलेल्या निर्दयी शब्दांना भावनेच्या जाळ्यातून सोडवण्याचे काम शब्दच करू लागतात


एखादा शब्द आयुष्य संपवताना हृदयाच्या दगडावर असा काही उमटतो
कितीही पुसायचा प्रयत्न केला तरी
शब्द नव्याने पुन्हा जन्माला येतो
शब्द नव्याने पुन्हा जन्माला येतो

              प्रणव प्रभू