Kavita Kiran Kshirsagar

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Kavita Kiran Kshirsagar

kiran Kshirsagar
   हरवले स्वप्न
 ते तेव्हाचे स्वप्न माझे
 होते अलगद छान
 ते हरवले आणि मी
 विसरलो देहभान .

 मी बंदिस्त केले नाही
 त्या स्वप्नास उराशी
 म्हणुनी आज हळहळतो
 स्वतःच्याच मनाशी.

 त्या स्वप्नाने मला शिकविले
 ध्येय काय असावे
 तेच मी हरवून बसलो
 अन ठरले  सगळे फसवे.

 आठवणीत नाही उरले
 पुसटसेही अंश
 तरीही वाटत असते
 झालाय मनाला दंश.
 
     किरण क्षीरसागर