कविता II माझी फक्त एक "समाधी" आहे .... II

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता II माझी फक्त एक "समाधी" आहे .... II

Siddheshwar Vilas Patankar

अंत्ययात्रेआधीच माझ्या मनाचे दहन होतं  आहे

अगं आता सहन होतं नाही आहे

आधी मित्रांचा पाडाव

बरोबर केलेला तू प्रेमाचा शिडकाव

"फक्त तू आणि मी " हि दिलेली शप्पथ

पाळण्यासाठी खेळावा लागणारा लपंडाव

हे सारं ठीक होतं लग्नाआधी

कशी विसरू मी

तू बांधलेली लग्नानंतर माझ्या मनाची समाधी

आत्ता जेव्हापण वर तल्लीन होऊन बघतो

मी माझ्या मनात हरवतो

फार काळ लोटत नाही त्या तंद्रीत

कर्मचारी त्याच्या निर्गमनाची वर्दी देतो

तेव्हा कुठे भानावर येतो

हो मी नेहेमी हरवतो माझ्या कामावर

मी असतो माझ्या मनात

जिथे सर्व माझ्या सोबत असतात

गुजगोष्टी करतात

मला ओढत असतात

परत परत त्याच वाटेवर

जी जुनी असूनही नवीन असते माझ्यासाठी

कारण मी आत्ता  मीच उरलो नाही

माझ्या मित्रानो

हि जी दिसतेय ती आता फक्त

माझी समाधी आहे

माझी फक्त एक "समाधी" आहे ....सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास