कविता II नकळत हा जीव तुझ्यामागं वळत गेला, जसा जसा सूर्य ढळत गेला II

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता II नकळत हा जीव तुझ्यामागं वळत गेला, जसा जसा सूर्य ढळत गेला II

Siddheshwar Vilas Patankar

अशाच सुचल्या ओळी

तुला बघूनि सांजवेळी

जसा सूर्य ढळत गेला

भावनेचा अर्थ कळत गेला

प्रेमबीम केलं नव्हतं कधी

तरी का कुणास ठाऊक

जीव तुझ्या मागे पळत गेला

पुस्तकं बहू वाचली असतील

काही समजली तर काही नसतील

तुला बघून एकाएकी

साऱ्याचा मतितार्थ कळत गेला

हरेक शब्दांचा अर्थ कळत गेला

नकळत हा जीव तुझ्यामागं वळत गेला

जसा जसा सूर्य ढळत गेला


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास