कविता II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

Siddheshwar Vilas Patankar

भ्रम कैवल्याचा साधला

भक्ती नामातच तू बांधला

कुणी पहिला रे तुला

दगडामध्येच अडकला

खांब सोनेरी रुपेरी

तरी उभा विटेवरी

बडवे मातले ते सारे

उगा भक्तांसी छळेऱे

दावा कोरी नोट त्यांसी

बनवून माऊलीस दासी  

बडवे  राजभोग भोगती

तुझा दरबार पातला,

दुर्लभ भक्त दर्शनासी

स्वतः समजून ते राजे

शिवीगाळ गाभारा माजे

कैसी शिस्त नाही जाण

कोऱ्या नोटेस फक्त मान

तुझ्या दरबारी विठुराया

फक्त लक्षुमीची छाया

हात सोड कटेवरचे

उचल बडव्यांशी लढावया


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

विजया केळकर
     
   आपणही बनलो दगडाचे
  करत  अनुकरण पांडुरंगाचे
 परि अता  लेखणीने काम करायचे
   बडव्य़ांना बडवायचे~~~~~~
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

Siddheshwar Vilas Patankar
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
हे विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील वास्तव आहे . तिथे शिवीगाळ अजूनही होते आणि कुणाचाच अंकुश नाही . बडवे आणि फक्त बडवे यांनीच घेरलं आहे माउलीला .
धन्यवाद मॅडम आपल्या अभिप्रायाबद्दल
सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास