कविता II कोण म्हणतं आम्ही कवी आहोत II

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता II कोण म्हणतं आम्ही कवी आहोत II

Siddheshwar Vilas Patankar
कोण म्हणतं आम्ही कवी आहोत

हा मुळी आमचा प्रांतच नाही

जे घडतंय जे बघतोय

ते अजून बिघडू नये

म्हणून शब्दांत मांडतो

आम्ही कधी समाजाशी भांडतो

कधी हसवतो , कधी नेतो रानात

कधी जगाच्या पाठीवर

तर कधी नदीच्या काठावर

कधी समुद्रात फेसाळतो त्यांना

कधी वाऱ्याबरोबर सुकवतो त्यांना

कधी तार्यांची सैर करतो

कधी कंटकांशी वैर करतो

आम्ही इथेच असूनही

मनाने संचार करतो

कविता नाही करत

फक्त तुम्हाला स्मरतो

फक्त समाजासाठी मरतो

म्हणूनच भावना शब्दांत मांडतो


सिद्धेश्वर विलास पाटणकर Cपाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता II कोण म्हणतं आम्ही कवी आहोत II

Ankita patil
वा...शब्दच नाही एवढंच म्हणेन...**अप्रतिम**
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता II कोण म्हणतं आम्ही कवी आहोत II

Siddheshwar Vilas Patankar
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
thank you.....
पाटणकर सिद्धेश्वर विलास