कविता II हेच सारं पाहून तो फक्त हसत बसलेला II

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता II हेच सारं पाहून तो फक्त हसत बसलेला II

Siddheshwar Vilas Patankar

तो का हसला ?

कसा हसला ?

हसताना कसा दिसला ?

मी नाही पाहिला

पण एक मात्र नक्की

तो हसला

हसला आणि म्हणाला वेड्या तू पण फसला

माझ्यासारखा

हे हृदयाचं गणित पडलं कि पडतं

अन मग हळू हळू उडतं , आयुष्य

ते सोडवता सोडवता

सगळं काही बिघडतं

एका वेड्या आशेवर

निर्माण होतात अनेक निराशा

आपलाच चेहरा नंतर वाटू लागतो

भूगोलाचा नकाशा

अवतरतात गंगा यमुना वेळोवेळी

दुःखरूपी विंध्य सह्याद्री असतात

उभे अचल तिन्ही काळी

आठवणी साठून साठून तप्त झालेल्या

वाळवंटाचा पसारा नकाशात

पसरत चाललेला

हेच सारं पाहून तो फक्त हसत बसलेला

तो फक्त हसत बसलेला


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता II हेच सारं पाहून तो फक्त हसत बसलेला II

Ankita patil
खूप सुंदर आहे कविता ** खास करून प्रतयेक ओळीतील "शब्द" खूप सुंदर रित्या त्या ओळीला अर्थ देतो.......
खूप आवडली..**--**
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता II हेच सारं पाहून तो फक्त हसत बसलेला II

Siddheshwar Vilas Patankar
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद
पाटणकर सिद्धेश्वर विलास