कविता II जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही II

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता II जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही II

Siddheshwar Vilas Patankar


नजरेतून पायउतार होणं

कधी जमलंच नाही

काय शोधत होतो अखेरपर्यंत

कधी कळलंच नाही

तो वेग मंदावला असाच

वारा बेभान वाहतच होता

धावता धावता कधी थांबलो

ते कळलंच नाही

खाली जमिनीवरून घेतला

वेध मी आकाशाचा

इच्छा धरिता मनात

तारा निखळून पडला

काय मागितलं होतं

अन काय पदरात पडलं

ते समजलंच नाही

सांगोपांगी कथा बहू ऐकल्या

काही ठेवल्या मनात

तर काही पोटात

जे घडलं प्रेमात माझ्या

ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही

माझं प्रेम माझ्याकडेच राहिलं

ते मला कधी फळलंच नाही


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता II जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही II

Ankita patil
खूप सुंदर आहे कविता...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता II जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही II

Siddheshwar Vilas Patankar
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद
पाटणकर सिद्धेश्वर विलास