ना कधी मी भेटलो तिला पुन्हा , ना मला ती भेटली

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

ना कधी मी भेटलो तिला पुन्हा , ना मला ती भेटली

Siddheshwar Vilas Patankar


जमत नव्हतं गाड्या मला

ते डोळ्यातले भाव वाचायला

सोबत जरी असली तिची

तरी भावना उमलण्याची फक्त मैत्रीची

ती भेटायची नि बोलायची

निसर्गसौंदर्यावर बरंच काही

मी फक्त कुणी बघतंय कि नाही

तेव्हढंच पाही

ती बोलत राहायची अखंड अविरत

डोळ्यात डोळे घालून

मी मात्र पुऱता त्रागा करायचो

गप्प बसायचो माश्या मारत

तिने केली प्रयत्नांची शर्थ

पण माझ्यापुढे ठरले सारेच व्यर्थ

एक सुंदर नाते मैत्रीचे मीच जपलेले
 
तिने मात्र एक व्हायचे स्वप्न पाहिलेले

काळाने हळूहळू समीकरणे स्पष्ट केली

समजता सारे मला , मैत्री तिथेच मेली

ना कधी मी भेटलो तिला पुन्हा

ना मला ती भेटली


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ना कधी मी भेटलो तिला पुन्हा , ना मला ती भेटली

Ravikolhal
very nice lines sir
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ना कधी मी भेटलो तिला पुन्हा , ना मला ती भेटली

सोपान देसले
खुप खुप छान सरजी
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ना कधी मी भेटलो तिला पुन्हा , ना मला ती भेटली

Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद सोपान साहेब ...आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ना कधी मी भेटलो तिला पुन्हा , ना मला ती भेटली

Siddheshwar Vilas Patankar
In reply to this post by Ravikolhal
धन्यवाद रवी साहेब ...आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
पाटणकर सिद्धेश्वर विलास