टुमदार बंगली

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

टुमदार बंगली

विजया केळकर
          टुमदार बंगली
टुमदार बंगलीच्या  -  प्रवेशदारी कमान
बोगनवेल झुकली  -  मग उंचावते मान
मधुमालती चढली  -  नक्षीदार जाळीतून
निळी-पांढरी गोकर्ण  -  टवकारती कान
कुंपणावरील कोरांटी  -  कां करते तणतण
गुलाबकळी हसली  -  तेवढ्यात खुदकन्
आत टाकलं पाऊल  -  लाजवंतीस चाहूल
लाल पिवळी कर्दळी  -  न् लाललाल जास्वंदी
बोलेल कशी तगर  -  खुणावेल ती अबोली
चमेलीच्या अंबराला  -  पानाफुटीची झुंबर
गारवेलीचा गार वारा  -  खाली चिमणा पसारा
चाफा कां झाला अस्वस्थ  -  उभा प्राजक्त तटस्थ
गाणे गाई कुंदकळी  -  गोफ गुंफी गुलबाक्षी
मुरडता चाफेकळी  -  पारिजात होई साक्षी
जाई-जुई बहिणींनी  -  गणेश वेल धरली
विजयात रातराणी  -  निशिगंधी विसावेल

       विजया केळकर _______
  bandeejaidevee blogspot.com
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: टुमदार बंगली

siddheshwar
Sundar kavita zaaleli aahe , madam...


Siddheshwar Vilas Patankar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: टुमदार बंगली

विजया केळकर
In reply to this post by विजया केळकर
धन्यवाद ,आम्ही अशोनगर ला सरकारी क्वार्टर मध्ये काही वर्ष होतो ,भोवती भरपूर जागा त्यामुळे त्यावेळी फुलविलेल्या  बगीच्याला
          कल्पनेची जोड दिली अन् 'टुमदार बंगली ' साकारली
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: टुमदार बंगली

Siddheshwar Vilas Patankar
छान आवडले हे ऐकून कि आपण बागसुद्धा बनवली आहे. निसर्ग कुणी स्वतःहून फुलवला तर हि देखील एक प्रकारची समाजसेवाच ठरते .. धन्यवाद मॅडम , निदान तुमच्याकडून ह्या हयातीत हे सुंदर काम झालेले आहे . माझीपण हि इच्छा आहे .. ती पूर्ण व्हावी हि मी देवाकडे प्रार्थना करतो ..

पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास