नको असलेला स्पर्श..

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

नको असलेला स्पर्श..

navin
नको असलेला स्पर्श..
काल ऑफिस मधून रूम वर येण्यासाठी बस मध्ये बसलो, बस बऱ्यापैकी भरली होती. माझा स्टॉप आला आणि मी उतरण्यासाठी पुढे गेलो आणि माझ्या समोर एक मुलगा होता तो उतरला, तो मुलगा उतरत असताना हळूच त्याने एका मुलीला मागे स्पर्श केला. खरेतर बस मध्ये इतकी जागा नक्कीच होती कि तो स्पर्श न करता उतरला असता. मला कसेतरी वाटले पण मी काही बोललो नाही आणि ती मुलगी पण काही बोलली नाही, तिला कळले असणार ते. कळणारच तिला, असल्या गोष्टी मुलींना लगेच कळतात पण ती का काही बोलली नाही हे नाही कळले. ठराविक तिने दुर्लक्ष केले किंवा अशी गोष्ट तिच्यासाठी काही नवीन नव्हती त्यामुळे तिने त्याला जास्त महत्व नाही दिले. त्याने का तसे केले असेल, असे काय भेटले त्याला तसे करून. खूप गोष्टी असतात ज्याचे उत्तर लवकर मिळत नाही.
हाच किस्सा मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं तर ती माझ्यावर आणि त्या मुलीवर दोघांवर चिडली, ती म्हणाली त्या मुलीने ती गोष्ट दुर्लक्ष नाही करायला पाहिजे होती. तिने दुर्लक्ष केल्यामुळे त्या मुलाची भीड चेपणार आणि हेच तो दुसऱ्या मुलीसोबत करणार. एक ठिणगी सुद्धा कधी कधी वणवा पेटवून देण्याचे काम करते त्यामुळे कुठलीही गोष्ट हलक्याने नाही घ्यायची, त्याला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे होता ज्यामुळे निदान त्या बस मध्ये असणारे दुसरे लोक त्यातून बोध घेतील किंवा ती गोष्ट तो परत नाही करणार.
हि एक छोटीशी गोष्ट झाली पण हीच गोष्ट नेहमी कुठल्या ना कुठल्या रूपात मुलींना सहन करावी लागते, कधी बस, कधी ट्रेन तर कधी ऑफिस मध्ये कुठे ना कुठे असे किस्से दररोज होत असतात आणि आपण सगळे कळून दुर्लक्ष करत असतो. घरात नेहमी मुलींना उपदेश दिले जातात, मुलींच्या जातीने नीट वागावे, रस्त्याने जाताना मान खाली घालून जावे, कपडे व्यवस्थित घालावे वगैरे वगैरे, कधी मुलाला असे उपदेश दिलेले ऐकिवात नाही. मुलींना बंधन घालण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना चांगली शिकवण दिली तर किती छान होईल. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः' असा एक संस्कृत मध्ये श्लोक आहे ह्याचा अर्थ असा होतो कि ज्या कुळामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो, त्यांना आदराने वागवले जाते तो परिसर किंवा त्या कुळामध्ये देव रममाण होतात. आपल्या आयुष्यात आपण हा श्लोक वापरला तर किती बरे होईल. खरेतर आपण कुणावर अवलंबून राहता कामा नये, आपली सुरक्षा आपण स्वतः करावी. आपण जर आपली मदत नाही करणार तर कुणी आपल्याला मदत नाही करणार. कधी कधी काही गोष्टी सहन करण्यापेक्षा त्याचा सामना करणे खूप चांगले असते, कारण एखादी गोष्ट जर आपण सहन केली तर त्याची आपल्याला सवय लागते आणि एखादी सवय लागणे हि खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे उठा आणि सामना करा.

navin..