कवितेचं झाड

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कवितेचं झाड

विजया केळकर
       कवितेचं झाड

   लावा झाडं लावा म्हणून खरं तर
लावले एक - खपले मर मर
झालं कि एक वितेचे झाड म्हणजे वीतभर
कधी वाटे मरून गेले जर-तर
    मेलेच अखेर ..
टिपे गाळली झरझर
दु:ख नव्हते दाखविले वरवर
पण... मग त्याभोवती फिरत राहिले गरगर
अचानक आतून आवाज आला 'धीर धर '
   ? ? विचार कर
घडले जादुमंतर,,दिसला एक अंकूर
दबले असावे बीज खोलवर
द्रवले असावे त्याचेही अंतर
पाहता पाहता झाले कि एक वितेचे झाड
   ओ..य ..एक कवितेचं झाड .........
    विजया केळकर _______