कविता ॥ या वळणावर येऊनि थांबतो , मागतो दान श्रापांचे॥

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता ॥ या वळणावर येऊनि थांबतो , मागतो दान श्रापांचे॥

Siddheshwar Vilas Patankar


या वळणावर येऊनि थांबतो

मागतो दान श्रापांचे

रक्त आटले, हृदय फाटले

हातपाय काय कामाचे ?

धमनी सारी नाजूक साजूक

जननी आहे खमकी

खिसा फाटला पगार आटला

वाजव मायेची टिमकी

स्रोत चालले , स्रोत वाहिले

करी विवंचना पुढली

फळे गोड ती वाटली तरी पण

अक्कल गहाण पडली

ठाव शोध तू , डाव मोड तू

दिसूनही आंधळा झाला

वर्तमान जरी भविष्य मांडे

भूताचा गोंधळ उडाला

माग श्राप तू , माग भीक तू

झोळी सदैव खाली

अरे आंधळ्या , अरे करंट्या, सुधर जरासा

 प्रेम दे त्या माउली,  

अन कर पुण्याची रखवाली


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास