"#निशब्दातला #भावगर्भ"
काही न बोलता आज तीने..
फक्त हातावर हात ठेवला होता;
खरंच कळलं हो न बोलता ही..
भावना अगदी सहज उमजून येतात;
तसा प्रत्येकालाच आज काल..
स्वतःसाठी space हवा असतो;
पण आपुलकीचा base पुरेपूर असला..
तर निशब्दातले भावगर्भ ही;
सारं काही बोलून जातात.
- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar