कविता ॥ हलायचं नाय कि डुलायचं नाय , हाताची घडी , तोन्डावर बोट आणि एकदम गोगलगाय ॥

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता ॥ हलायचं नाय कि डुलायचं नाय , हाताची घडी , तोन्डावर बोट आणि एकदम गोगलगाय ॥

Siddheshwar Vilas Patankar


मित्रा, तुला कधी पैश्याचं गणित पडतं कि नाही ?

तुझं त्याच्यावाचून घोडं अडतं कि नाही ?

मला नेहेमी पडतं , आणि माझं कायम अडतं

सालं आपलं घोडंच लंगडं

कधी फुटतं तांबडं आणि कधी अंधारतं

ते समजतच नाही  

पैसा कसा येतो न जातो , ते बी उमजतच नाही ॥

मोठाली स्वप्न या राजकारण्यांची

का बरं आपणच बघायची ?

दर पाच वर्षांनी असतो मोठाला कार्यक्रम

आपण सालं असंच कुत्र्यावानी जगायचं

जणू ठरलेला नेहेमीचा क्रम

हलायचं नाय कि डुलायचं नाय

हाताची घडी , तोन्डावर बोट आणि एकदम गोगलगाय

कोण बाजूला मरत असेल तरी खांदा देऊन घरी यायचं

दुसऱ्यादिवशी परत उठायचं आणि कामाला लागायचं

हलायचं नाय कि डुलायचं नाय

हाताची घडी , तोन्डावर बोट आणि एकदम गोगलगाय ॥

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास