कृष्ण कृष्ण

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कृष्ण कृष्ण

विजया केळकर
      कृष्ण कृष्ण
  गोरा कापूर धुरात विरता कृष्णरूप झाला
  गोरी राधा जशी कृष्णाशी एकरूप झाली

  डवरला पारिजात कृष्णाप्रेमात दारी
  डबडबले नयन,काजळ-कृष्णप्रेम ओघळे गाली

  बोटावर बांधी,भरजरी चिंधी द्रोपदी बंधुप्रेमात
  बोले कृष्ण, अडकलो जन्मभरी ऋणात

  लेऊन माळा,खोऊन मोरपीस शोभे कृष्णरूप
  लेऊन वाळा,बांधिता उखळा,डावी क्र्यष्ण विश्वरूप

  रगेल-क्रूर मामाकंस,आठवे देवकीचा आठवा बाळ
  रचिले अनंत घातक उपाय न यावा कृष्ण काळ

  'जसे करावे तसे भरावे 'हेची तथ्य
  जडवत् पार्थ, सांगे गीता कृष्ण करता सारथ्य

  नीर रंगहीन, रंगत रंगले जैशा गोपी कृष्णमय
  नीट आडवी वाट, फोडी माठ, आणिक हवं काय!!

   वाहे यमुना काळी
   ढवळी गाय तीरावरी
   दिसली शेजारी मूर्ति सावळी
   वळती पाऊले त्या वाटेवरी
   सहजी उमटे स्वर आवडीचा त्यावेळी
   झाला आज गोकुळात -आनंदी आनंद******
    बोला कृष्ण कृष्ण गोविंद *************

           विजया केळकर ____
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कृष्ण कृष्ण

Siddheshwar Vilas Patankar
कविता सुंदरच आहे , पण खाली यमक जुळवण्याचा प्रयत्न केला आहे . आवडला तर लोभ असावा आणि नाही आवडला तर माफी ...


वाहे यमुना काळी
तीरावरी गाय ते ढवळी
 दिसता शेजारी मूर्ति सावळी
   पाऊल त्या वाटेवरी वळी
   सहजी उमटे अंतस्वर वेळोवेळी
   आनंदी आनंद झाला आज गोकुळी ******
    बोला कृष्ण कृष्ण गोविंद *************

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कृष्ण कृष्ण

विजया केळकर
धन्यवाद ,बदलही छान सुचाविलाय.म्हणून पुन्हा धन्यवाद