।। नटली वसुंधरा ।।

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

।। नटली वसुंधरा ।।

sanjaykanhav
।। नटली वसुंधरा ।।

लेवुनी साज साजरा,
कशी नटली वसुंधरा ।
दिसते शोभुन तिला,
हा रंग नुतन हरा ।।

मऊ मखमली गालीचा,
चोहींकडे आंथरीला ।
नववधुने जसा,
हिरवा शालु पांघरीला ।।

दवबिंदुंची माळ,
दिसते शोभुन लख्ख ।
नटली सुंदरी घालुन,
मोत्यांची माळ नेक ।।

फुलांनी रंग उधळले,
नयनरम्य दृश्य भारी ।
बागडतात फूलपांखरे,
घेऊनी रंगछटा न्यारी ।।

झरे नाले खळाळती,
डोंगरे द-यांतुनी खाली ।
जसा दुधाने अभिशेख,
केला वसुंधरेच्या भाळी ।।

तुडुंब भरलेल्या धरणांत,
आपलेच पाहून रूप ।
वा-याच्या गतीने मग,
गाते धुंदीत राग भुप ।।

अशी नटली वर्षाऋतूत,
ही वसुंधरा गोल ।
जोतो नयनांमध्ये घेतो,
साठवुनी ठेवा अनमोल ।।

*कवी संजय कान्हव* (कान्हा)
तालुकाध्यक्ष  अ भा म सा प इगतपुरी
धारगाव पो. वैतरणा ता. इगतपुरी जि. नाशिक
मोबा. 9850907498
sanjay.kanhav@gmail.com