।। कन्यारत्न ।।

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

।। कन्यारत्न ।।

sanjaykanhav
।। कन्यारत्न ।।


मुलगी काय नी
मुलगा काय ते
*समानता गाते*
जीवनाची

असेल फरक
वेगळे स्वरूप
*मनाचिये रूप*
सारखेची

उमलुद्या *कळी*
फुलुद्या फुलास
सुंदर जगास
फुलविण्या

नाही कमी मुली
*जिजाऊ सावित्री*
बघा तुम्ही खात्री
इतिहासा

पातक भ्रूणाचे
नका घेऊ पाठी
*जीवनाची काठी*
तिच खरी

*कन्यारत्न माता*
जगाशी निर्मिती
नाही नातीगोती
तिच्याविना

ताई माई आका
कधी प्रिये सखी
तीच करी सुखी
*जीवनाला*

*कवी संजय कान्हव* (कान्हा)
तालुकाध्यक्ष  अ भा म सा प इगतपुरी
धारगाव पो. वैतरणा ता. इगतपुरी जि. नाशिक
मोबा. 9850907498
sanjay.kanhav@gmail.com