कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल

classic Classic list List threaded Threaded
6 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल

Rahul vedpathak
📝📝📝📝📝📝📝📝📝📝*तुला लिहताना..*

📝📝📝📝📝📝📝📝📝📝

*माझ्याशी तिचं नांव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल..*

सकाळच्या ब्रेकफास्टला सँडविच  टोमँटो कँचप सोबत तुम्हाला सेव्ह येईल..

ओहमवर उखळेला चहा आलं वेलची टाकून तुम्हाला पिता येईल..

आणखी थोडे पुढे जाल तर..

बाथरुममधील कॉक सुरु करुन शॉव्हरच्या पाण्याखाली तुम्हाला न्हाता येईल...

*माझ्याशी तिच नांव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल..*

तिथे अडकवलेल्या आभाळाच्या टॉवेलने तुम्हाला अंग पुसता येईल..

सुर्याच्या आरशात पाहून तुम्हाला पावडर लावता येईल..

वाऱ्याची झूळूक हाताशी धरुन केस तुम्हाला वळवता येतील..

एखादया झाडाच्या फांद्यीच्या कंगव्याने भांग तुम्हाला पाडता येईल..

*माझ्याशी तिच नांव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल..*

गर्द हिरवळीची चटई करून  अलादिन सारखं तुम्हाला हवेत तरंगता येईल..

अॉफिसला, पिकनिकला अगदी फुक्कट तुम्हाला जाता येईल..

पिज्झा,बर्गर,चायनीज हवे तिथे जाऊन सुपरमँन सारख तुम्हाला खाता येईल..

सुरमय,पापलेट,मालवणी स्पायडरमँनसारख कोषटयाच्या जाळयाने तुम्हाला ओडता येईल..

छोटाभीम सारख पोट भरुन पुरेपुर तुम्हाला जेवता येईल..

*माझ्याशी तिच नांव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल..*

दिवसभर फिरुन ,शेकडो कामे करुन रात्री तुम्हाला झोप येईल..

आकशातील चंद्राची कोर तुम्हाला उशी म्हणून घेता येईल..

लखलखणाऱ्या चादंण्याची चादर तुम्हाला अंगावर ओढता येईल..

*माझ्याशी तिच नांव तुम्हांला बिनशर्त जोडता येईल..*

         *- राहुल वेदपाठक*

✍✍✍✍✍✍✍✍✍
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल

Rahul vedpathak
टाईप करताना राहिलेली चुक..

तुम्हाला सेव्ह करता येईल..
गँसवर चहा..

क्षमा असावी..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल

Siddheshwar Vilas Patankar
In reply to this post by Rahul vedpathak
राहुलजी कविता छान आहे . यमक उत्कृष्ट जुळून आले आहे . आपणास  जर भावी कवितेमध्ये काही संदेश देता आला तर अति उत्तम होईल . मला वाटत आपली कारकीर्द किंवा कविता लिखाण अजून बहरेल.
मला आपली कविता आवडली . एकदम हलकीफुलकी वाटली . माझा अभिप्राय आपण सकारात्मकरित्या घ्यावा हि नम्र विनंती .

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल

Rahul vedpathak
In reply to this post by Rahul vedpathak
धन्यवाद..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल

rohit
In reply to this post by Rahul vedpathak
Rahul must.. Keshor kadem.real..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल

Rahul vedpathak
In reply to this post by Rahul vedpathak
तुलना नको रोहितजी
धन्यवाद...