पंढरीनाथ

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पंढरीनाथ

विजया केळकर
                       पंढरीनाथ
     किती दिस लोटले देवा,परि
उभाचि आहेस वीटेवरि

रमलास भक्तात चंद्रभागेतिरि
थकलास कां हात ठेवूनि कटेवरि?

नगरा नगरातून येती वारकरि
कोणी तुळस घेती डोईवरि

गोड भजने गात दिंडी बरोबरी
जय जय राम कृष्ण हरि

खटले संसारीआठवीत नाथ पंढरी
पण नाही देखियला डोळा आजवरि

लेकीस माऊली घे कडेवरि
आणिले हार तुळशी मंजिरि

चला जाऊया , या आनंदपुरी
संगे घेऊन मावशी, काकू व सखीपरिवारी

              विजया केळकर______