वाड्याच मनोगत

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

वाड्याच मनोगत

bajirao pandav
वाड्याचही एक मनोगत आहे
कठोर भिंतीमागे त्याचही एक मन आहे
मला दिसतायत ते चिरे ढासळताना
सोबत इतिहासात आपलच मढ गाडुन घेताना

बसलो हो भग्नवाड्यापाशी
बघितला वास्तुपुरुष प्रकटताना
दिसत होत डोळ्यात पाणी अण आनंद ही
सार्थकी जीवन आठवताना
हलकेच हसला मला बघुन मग बोलला

" अरे खंत कशाची करु मावळ्या भाग्यवंत मी थोर
जाहलो आसरा त्यांचा
ज्या मर्दानी पाहीला होता ध्वज भगवा तो अटकेपार फडकताना
पाहीले त्यांचे संसार सुखाचे
इथे विरल्या किंकाळ्या जे
पडले होते पानीपतला
धर्मासाठी लढताना"
तेवा हळुच निरखिलं ती भावुकता दिसली हलताना
पुढे बोलला
"पाहील्या तुझ्या  रणवीर पिढ्या त्या
पाहीला तयांचा तेजस्वी त्याग
एक अपेक्षा तुजकडुन लेकरा
बदलो कितीही काळ बदलो कसाही वेळ
विसरु नको या मातीला नको विसरु तु धर्माला
कारण
पाहिलय मी इथल्या इंच इंच भुमीवर सांडलेल रक्त साकळताना"

बाजीराव©
baji