ज्योत

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

ज्योत

विजया केळकर
   समईची ज्योत तेवते होता संध्याकाळ
   वात मनात म्हणते -झाली का सकाळ

   चैतन्य पसरते सभोवती जगावेगळ
   अनन्य दिसते भक्ती केवळ

   नमना करते हात येती जवळ
   गोष्ट असते अगदी साधी सरळ
 
   सवयीचे होते, होतेच सगळ
   नवी हाक ऐकू येते, जातेच मरगळ

   धुतले जाते मळभ मनावरचे काळे
   कळत नकळत वाटते काहीसं निराळे

   स्नेह संपता आली भोवळ, तरी व्हायचं उजळ
   मन जपता तुटली पोवळ,व्हायचं मोकळ

                             विजया केळकर ____
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ज्योत

Pavan gorade
Mam khup chan

Joyti badal ajun kahi mi tumhala send karat ahe.
Kuni lihiale ahe mahit nahi tari pathavat ahe

"तू सकाळी आंघोळ झाली की आधी काय करतोस...?"
.
.
अचानक तिने मला प्रश्न केला...
.
.
.

मी उत्तर दिलं, "सगळ्यात आधी देवाजवळ दिवा लावतो"....
.
.
त्यावर तिने विचारलं, "का...?
.
.
"आपल्या घरात तर वीज आहे शिवाय दिवस ही आहे तरी देवाला वेगळा दिवा लावायची गरज का भासते...?"..
.
.
माझ्याकडे ह्या प्रश्नाचं तसं बघायला गेले तर उत्तरच नव्हतं...
.
.
तरी मी म्हणालो की देवापुढे उभं राहीलं, निरांंजन लावलं की मला मनःशांती मिळते"...
.
.
त्यावर पुढे जे काही ती बोलली ते तुम्हा सर्वांबरोबर आवर्जून शेअर करावस वाटतं.......
.
.
.
.
.
.

ती म्हणाली "कदाचित आत्ता मी जे सांगत आहे ते तुला काहीसं विसंगत वाटेल, पण समजून घे"...
.
.
तुला सांगू का, प्रत्येक माणसाची जातकुळी वेगळी असते...
.
.
आपण एखाद्याला बघितल्यावर किंवा त्याच्या वागण्यावरून काही विशेष ठोकताळे बांधतो......
.
.

काही माणसं काही क्षणातच मनाला भावतात तर काही कितीही सहवासात राहिली तरी ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही......
.
.
मन एक अजीब रसायन आहे...
.
.
.
फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसते...
.
.
.
खूप सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत आणि अहंकारयुक्त असेल तर ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते, कितीही सुन्दर दिसत असली तरीही...
.
.
कारण शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो...
.
.
शरीर तर निमित्तमात्र आहे...
.
.
त्याच व्यक्तीच्या स्वभावात गोडवा , विनयशीलता आणि शालीनता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...
.
.
.
तू म्हणतोस देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं...
.
.
.
घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो...
.
.
सहवासातील माणसांचं देखील तसेच असतं...
.
.
एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं, हा काही क्षणांचा खेळ असतो; पण खरे आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजानेच मिळतं...
.
.
आयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात......
.
.
.

काही जण तुम्हाला दिपवून टाकतात तर काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात..........
.
.
.
परंतु ह्या सगळ्यात खरं प्रेम समईच्या ज्योतीसारखं रहातं......
.
.
.

शांतपणे तेवणारं आणि मनाला शांती देणारं.......
.
.
.

जगात कुठलीच गोष्ट शाश्वत , निरंतर नसते पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं, जगण्याची उमेद देत.
.
.
नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याचा पराभव निश्चित होतो...
.
.
.

अंधारल्या खोलीत लावलेलं निरांजन जसं दाही दिशा उजळतं, खरे प्रेमदेखील तुमची अशीच सोबत करतं.....
.
.
.
मनाला विश्वास देत जगाने नाकारलं तरी माझं प्रेम पाठीशी नेहमीच ठामपणे उभं राहील.......
.
.
प्रेम म्हणजे भक्तिचेच एक रूप आहे. ज्याच्यात आर्तता आहे, पण याचना नाही..........
.
.
.
आपल्या माणसांसाठी जळताना स्वतःच्या त्रासाची मोजदाद नाही........
.
.
.

साधा विचार करून बघ, भोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो ते का.........
.
.
.
कारण त्या तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो...
.
.
खरं सांगू?
.
.
.
असे, निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते, असं मला वाटतं...
.
.
पण आजकाल असं प्रेम मिळणं ही गोष्ट अशक्य आहे, हे ही मी जाणते......
.
.
मी प्रेमाविषयी लिहिते म्हणून तुला सहज सांगितलं"...
.
.
.
त्यावर मी प्रसन्न हसलो...!
.
.
.
.
कारण प्रेमाची एक वेगळी व्याख्या वेगळ्या शब्दात आज मी अनुभवत होतो...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ज्योत

विजया केळकर
    नमस्कार पवन
   कविता खरच  आवडली  व तसे अभिप्रेत केले त्या बद्दल धन्यवाद
      एखादी गोष्ट आवडली की आपल्या समोर ती भासू लागते ,एक अनुभूती होते,
   काही स्मरते.पुढील लेखावरून तसे जाणवले
     लेख खूपच छान त्यासाठी पण आभार.