रणांगणात हरवलेली लोक

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

रणांगणात हरवलेली लोक

MANOJKASTURE
आज या प्रचाराच्या चव्हाट्यावर बोलल्या जातात महापुरुषांच्या गाथा आणि वेळोवेळी बुडवल्या जातात तुकारामाच्या गाथेप्रमाणे त्यांच्या जीवनगाथा त्यांच्या जीवनाच्या पोळलेल्या अवशेषांचे तोडले जातात लगडे आणि आपण त्याच्याच चव्हाट्यावर जाऊन ऐकत बसतो त्यांच्या स्वार्थाचे गुणगान त्यांच्या फायद्यासाठी गायली जातात आपापल्या जाती धर्माची गीते अरे पण एखादा महापुरुष कोणत्याही जाती धर्माचा नसतो हे आपण कसे विसरतो हीच तर खंत आहे या भारत वर्षात म्हणून त्यांच्या नावाखाली मागितल्या जातात देणाऱ्याच्या पोराबाळांच्या तोंडातले घास