विचित्र

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

विचित्र

डॉ. सतिष पिंगळे
रंग नको पण चित्र हवे
जसा चंद्रमा नभामधे ।

रुप नको पण सुंदर हवे
जसा मयूर खगांमधे ।

रस नको पण रुचकर हवे
जसे मिठ अन्नामधे ।

गंध नको पण फुल हवे
जसी सदाफुली फुलांमधे ।

स्पर्ष नको पण सहवास हवा
जणु काळजी अंतरिची ।

काटे नको पण  घड्याळ हवे
आकाशी जसा सूर्य फिरे ।

मार्ग नको पण दिशा हवी
कवि मनाचे विचार जसे ।

भक्ति नको पण देव हवा
मनातला भाव जसा ।

शरीरात वसे पण स्थिर नसे
फिरतीवरति मन जसे ।