आसवं आणि पाऊस

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आसवं आणि पाऊस

Shashank kondvilkar

"आसवं' आणि 'पाऊस"

'आसवं' आणि 'पाऊस' तसं एक अनामिक नातं..
महान हास्य कलाकार 'चार्ली चाप्लीन' ही म्हणतात..
"मला पाऊस खूप आवडतो..
कारण त्यात माझ्या आसवांना लपवावं लागत नाही!"

तसं आसवांच एक विचित्र 'गणित' असतं जे मला
कधीच 'सोडवता' आलं नाही..
दुःख असो वा आनंद.. आसवं 'स्वच्छंद' असतात..
नेहमीच वाहण्याच्या तयारीत..
हं.. खरंच हसणं आणि रडणं यातला एक सर्वांगसुंदर
दुवा म्हणजे 'आसवं' त्यांचा ओघळण्याने..
'तन हलकं होतं आणि मन बोलकं!'

पण एक सांगू 'विरहातला' पाऊस हा 'आसवांचा' अगदीच जवळचा..
इतकी उत्साहीत असतात 'आसवं' की पावसाला 'कॉम्प्लेक्स' यावा!
अशावेळी पावसाला ही काही सुचत नाही.. अगदी असं..

"आवेग 'आसवांचा' इतका 'अनावर' झाला;
की 'डोळे' पुसण्यास ओला 'पाऊस' धावून आला,
पाहून 'आसवांना' जरासा तो ही स्तब्ध झाला,
'थेंब' कोणता 'तुझा' नि 'माझा' हेच कळेना म्हणाला."

- शशांक कोंडविलकर


Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आसवं आणि पाऊस

Ankita patil
खूपच सुंदर ...अप्रतिम ....