कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

कधी प्रश्न हि पडतो
कधी उत्तर मिळते
जगताना जगण्याचे
गुपित कळते


कधी एकांताचा क्षण
बोलूही लागतो
कधी आठवणीच्या शिदोरीतुन
अनुभवही मिळतो


कधी सुखाचा सागर
आटून निघतो
कधी दुःखाचा पाऊस
सुख शोधुन काढतो


कधी तहानही भुकेला
मारून टाकते
जगताना जगण्याचे
गुपित कळते


कधी एकटेपणा हा
जगाशी जोडतो
कधी गर्दीतही आपण
एकटे उरतो


कधी सूर्याचा प्रकाश
सावलीही देतो
कधी चांदण्यांच्या छायेतला
चंद्रही टोचतो


कधी कर्म हि मृत्यूला
अमरत्व देते
जगताना जगण्याचे
गुपित कळते
प्रणव प्रभू