|
कठीण आहे जगण म्हणता म्हणता
अजून एक दिवस सरला
नक्की कठीण काय याचा शोध घेत घेत
प्रश्न मात्र वीरला
आनंदातलाही आनंद हळू हळू
दुःखाच्या वाटेवर चालला
सुखाचा क्षण शोधता शोधता
दुःखाचा डोंगर मोडला
संकटाचा विचार करता करता
घाम डबडबून फुटला
संकटाशी लढता लढता
जीव भांड्यात पडला
काय कठीण अन काय सोपे
हे ठरवणारे आपण कोण ?
ज्याने जग दाखवले
त्याच्यावर अविश्वास दाखवणारे आपण कोण ?
प्रणव प्रभू
|