कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

आजचा समीर हा
का वेगळा वाटतो
सांग ना प्रिये मला
का भाव असा दाटतो


प्रेमगंध उगळता
का सुगंध दरवळतो
तुझ्या आठवणीत ही
का मी मलाच शोधतो


आसवांचा पाऊस हा
का हृदयातुनी बरसतो
गर्दीतही मी असा
का एकटाच चालतो


विसरताना विरह हा
का श्वास माझा ओसंडतो
सांग ना प्रिये मला
का मी असा वागतो


प्रणव प्रभू