कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

आठवत का तुला
तू पहिल्यांदाच माझ्यावर रुसली होतीस
गोऱ्या गोऱ्या गालांवर
तू लाली छान भरली होतीस


किती मनवल तरी
तू रुसवा सोडायला तयार नव्हतीस
माझ्या हसण्याकडे तेव्हा
तू लक्ष काही देत नव्हतीस


मी निघतो म्हणताच
तुला शेवटी तुझाच राग आला
तेव्हाच काय तो तुझा रुसवा
कुठच्या कुठे पळून गेला


खरच सांगतो तेव्हा
मीच माझ्यावर हसत होतो
तुझं निरागस प्रेम बघून
तुझ्याकडे पाहत होतो


आता नको ना एवढी रुसू
मला थोडी भीती वाटते
प्रेमबंध जास्त ताणले कि
नाते फक्त नावालाच उरते

प्रणव प्रभू