कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

आज-काल दिवसही पुस्तकाच्या पानासारखे डोळ्याखालून निघून जातात
एखादा क्षण जगेन म्हणायच्या आधीच आठवणी जन्म घेतात


रोज काय नव्याने जगायचं हा एकच प्रश्न सारखा सतावतो
उत्तराचा शोध घेण्यासाठी निघालेलं मन डोळ्यात अश्रू आणून ठेवतो


कधीतरी वाटत एकांतात जाऊन पुन्हा स्वतःचा शोध घ्यावा
हरवलेल्या मनाला शोधण्यासाठी बुद्धीलाही वेळ द्यावा


एकसारखा काय रडत बसायचं हा पण विषय आहे
हसून हसून दुःख रिचवण्यात खरच मज्जा आहे


   प्रणव प्रभू