कविता : या उभ्या संसारासाठी , जाळी जीवांच्या वाती

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता : या उभ्या संसारासाठी , जाळी जीवांच्या वाती

Siddheshwar Vilas Patankar
या उभ्या संसारासाठी

जाळी जीवांच्या वाती

काय घडे मज न कळे

काय घडे ते मज न कळे

घोर जिवाला लागी II १II

कस्तुरीमृग हे

सुगंध भिनवे

येई न हाती

शोध  सुगंधासाठी

काय घडे , मज न कळे

घोर जिवाला लागी

या उभ्या संसारासाठी

जाळी जीवांच्या वाती II २II

कल्पुनी बांधे माडी  न बंगला

कोण तुझ्या रे साठी

दुरून भासे सुंदर मृगजळ

स्वतः पावसी तू नाल्याकाठी

काय घडे , मज न कळे

घोर जिवाला लागी

या उभ्या संसारासाठी

जाळी जीवांच्या वाती II ३II


सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास