कविता : ऊठ मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता : ऊठ मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र

Siddheshwar Vilas Patankar
उठ  मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र
हे विश्वची अमुचे घर असे नसे केवल एक महाराष्ट्र
शिवरायाचा पाठ गिरवावा
भ्रष्टाचार समूळ उखडावा
सैनिकांचे रक्त सांडले
पावन अपुली भूमी
या मातीतच टिळकही घडले तर स्वातंत्र्योत्तर कृमी
नाळ आपुली पावन भूची
जा नसे तुम्हास जाण
उठ  मराठ्या आधी जागा हो
मग फिटेल सारे वाण  
बलिदानाची वेळ जाहली
पेटव साऱ्या मशाली
टाक एक तू पाऊल पुढचे
बघ पेटेल उभी ही दिल्ली
वाऱ्याचे तू रोख मोडसी
तुजसम नसे रे कोण धाडसी
अंगार जन्मतः नसनसात भिनला
का रे उगा तू रडसी
उठ  मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र
हे विश्वाची अमुचे घर असे नसे केवल एक महाराष्ट्र  
अंग्रेजी पिलावळ हि भारी
पिळून खाती सारी
माय माउली विकून खाती
ठेवी पुरावया माती
इतिहासाची पाने तू गिरवी
इतिहासच पुन्हा तू घडवी
या मातीचे मोल बाळगा
म्हणून म्हणतो दादा
उठ  मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र
हे विश्वाची अमुचे घर असे नसे केवल एक महाराष्ट्र II


सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास