आईच्या प्रेमाची जाण असु दया

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आईच्या प्रेमाची जाण असु दया

Kavitamahajan
साधारण दुपाराची २ वाजेची वेळ . घड्याळाचे ठोके संपतात तेवढयात कडीचा आवाज येतो……।  टक -टक ……  आपोआप दरवाजा उघडतो . एक अंधारलेली खोली कुठूनतरी सूर्याची किरणं डोकावत असतात . तितक्यात दरवाज्यातुन एक मंजुळ आवाज ऐकू येतो । " आई . अगं कुठंय तु ?" प्रतिउत्तरात अगदी जड अंतकारणाचा आवाज येतो , " पोरी तु आलीस कालपासुन तुझी वाट बघतेय ग़ …ये जवळ ये बाळ ." आज आईचे असे शब्द ऐकून मुलगी थोडी बिचकते. आज  कधीनव्हेते असे शब्द ती आईच्या तोंडून ऐकते. पण तरीही स्वतःला सावरत ती लाईट लावते . उजेडात तिला आईची खुप बिकट अवस्था दिसते …साडी फाटलेली … माठातल थंडगार  पाणी आवडत असलेल्या आईच्या खोलीत पाण्याची बाटली …. खोलीला ना झरोका न खोलीत पंखा.  तिला फार वाईट वाटत आणि कळेनास होत कि आईची अशी अवस्था का झाली. तरीही ती चेहऱ्यावर दुःख न दाखवता आईला म्हणते, " बघ आई आज तुझ्यासाठी मी काय आणलंय … तुझ्या आवडीची वांग्याची भाजी , गरम गरम डाळ -भात  त्यावर साजूक तूप . चल पटकन ऊठ आणि खाऊन घे. " आई उठते आणि पटापट खाऊ लागते अगदी घास संपत नाही तोवर दुसरा घास जणु दोन दिवस ती जेवलीच नाही . आता मात्र मुलीला राहवलं नाही आणि जेवण झाल्यावर प्रेमाने जवळ घेऊन आईची विचारपूस करायला लागली  "आई काय ग ही अवस्था . तुझा आवडता माठ नाही ,पंखा नाही आणि साडी का ग नाही बदललीस . आई , गेली सहा महिने दर रविवारी मी तुला भेटायला येतेय पण एकदाही दादा-वहिनी घरात दिसले नाहीत । का ग?  आई आणि ……………… " मुलीचं बोलणं पुर्ण होण्याआधीच आईने हंबरडा फोडला आणि मायेचा पाझर अश्रूतून बाहेर यायला लागला .  
             मित्रांनो अंगावर रोमांच उभं रहिल ना ! अहो , आज खरोखर अश्या किती माता असतील की ज्यांच्या कष्टाचं मायेचं फळ त्यांना अश्या प्रकारच्या दुःखात मिळत असेल . या लेखातली माता स्वतःच्या मुलासोबत राहत असुनदेखील  तिच्या दुःखाची जाणीव झाली ती तिच्या मुलीलाच . कसं असत ना ! परक्याच धन असुनदेखील मायेची जाण ही तिलाच जास्त असते .
              आज आपण २१ व्या शतकात जगत असलो तरीही अश्या कितीतरी माता आहेत कि त्या मुलगा हवा म्हणुन जप तप करतात , भोंदू बाबाच्या नांदी लागतात. का आणि कशासाठी ? देवाने प्रत्येकासाठी काहीतरी ठरवुन ठेवलेल असतं मग आपण त्याच्या चाकोरीबाहेर जायचं कशासाठी ? त्याने दिलेलं आनंदाने स्विकारायला हवं    ना ! नवसाने आणि लाडाने वाढवलेलं ते पोर ज्याला त्याची जाणीवदेखील नसते मग काय उपयोग त्या नवसाचा?  पण हेही तितकच खरं आहे कि आज जग झपाटयाने बदलत चाललय तरी जुन्या रूढी -परंपरा आहे तश्याच आहेत आणि म्हणूनच एका स्त्रीला मुलाला जन्म दयावाच लागतो तो ह्या समाजासाठीच मग भलेही तिचं मन ह्यासाठी तयार असो वा नसो . आपण फक्त म्हणतो मातृ देवो भव -पितृ देवो भव पण खरच तसं वागतो का ? प्रत्येकाने विचार करा .    
             आज पुरुषवर्गाला वाटेल कि त्यांनाच टोमणे मारले जातात पण मित्रांनो हि हकिकत आहे. लग्नझाल्यानंतर कधी आठवतंय का आईच्या मांडीवर सुखावलेलं, तिच्याशी बसुन प्रेमाने गप्पा मारलेलं. बायकोसाठी अगदी जेवण पण बनवणार पण आठवतय का कधी आईसाठी  साधा चहा केलेलं . वेडयांनो आज जग जरी बदलत असल तरी मायेचं पांघरून आजही तसचं आहे हो. ती अडाणी असली तरी ती तुमची जननी आहे. तिला असं दुःखात ठेवू नका . एक मुलगी दूर राहून तिची अडचण समजू शकते मग तुम्ही का नाही ? मुलीला तरी ती फक्त माहेरचा पाहुणचार करते पण रोज स्वतः आधी तुम्हाला  घास भरवणारी फक्त 'तीच' नाकी पाणीपुरीसाठी  हट्ट धरून रुसुन बसणारी. आज समाजाखातर का असेना पण तिने तुम्हाला जन्म दिलाय याची जाणीव ठेवा. तुमची आई भलेही सुनेसाठी चांगली नसेल पण तुमच्यासाठी आजही ती दाताच आहे . तिच्या कष्टाची , तिच्या नवसाची , तिने बळी दिलेल्या आशा अपेक्षांची जाणीव ठेवा  आणि अगदी म्हसनवटीपर्यंत तिला साथ दया हीच अपेक्षा !

© कविता महाजन
कविता महाजन
kavitapatil12@gmail.com