ए सांग ना

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

ए सांग ना

Aditi
ए सांग ना  रे माझ मालच कळत नाहीये  काय झालाय ते .तुला पाहिल्यावर एवढी उत्साही होते मी. अरे  तुझे डोळे  किती बोलतात माझ्याशी माहितीये तुला?  आता काय सांगू मी  तरी. खर तर तुझ्या कडे बघायची हिम्मतच होत  नाही भिती  वाटते. अस वाटत कि तू एकटक माझ्याच कडे बघ्तोयेस आणि मग काय माझी  नझर खाली होते आपोआप.
अरे हसू नकोस अगदी खरं बोलतेय मी.खोटं  वाटतय न तुला. माहितीये मला .एकदा बघ मग माझ्याकडे मग कळेन तुला कशी कावरी बावरी होते मी. ए ऐक न .तुझ्या प्रेमात  पडलेय  का मी?
हो???? 😳😳 काय म्हणतोस  तू तर आवडत नव्हतास  मला  मुळीच.तुझे  राउंड नेक चे  टी शर्ट आणि उभे  असलेले केस
शी किती राग यायचा मला.
पण आता तू आज  कोणता शर्ट घालशील याची वाट पाहते  मी
खरच वेडिये मी
अगदी तुझ्यासारखीच
जस तू  वेड्यासारखं बघतोस न  माझ्याकडे  तसच मला  पण होत रे तुला  पाहिल्यावर
बघ किती लिहिलंय मी तुझ्या साठी.
तुला सगळ खोटं  वाटत ना?माहितीये मला
ठीक आहे
 असू दे.
बाकी  काही  नको पण फक्त  इतकच  सांग कळलाय  का रे  तुला पण कि  प्रेमात  पडलेय मी तुझ्या???
.....आदिती