|
नेहमीच एक प्रश्न पडतो
कातरवेळी मनात शिरतो
त्याला मी कुरवाळत बसतो
विचारातूनी मग गुरफटत जातो
रोज चालते हेच नाटक
होतो मग मी त्याचा चातक
लागतेच ना अशाने चटक
विचार करतो नेहमीच अटक
अशे प्रश्न आधी सोडावे
या सवईला मग मोडावे
मागे लागता सरळ तोडावे
विचारानं पुढे मग कर जोडावे
जगणे किती सुंदर आहे
विचार केला मग माती आहे
दुःखाचे हे मूळ आहे
सुख यामध्ये लपले आहे
प्रणव प्रभू
|