कविता : चढणं म्हणजे काय असते रे भाऊ

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता : चढणं म्हणजे काय असते रे भाऊ

Siddheshwar Vilas Patankar
चढणं म्हणजे काय असते रे भौ
लेका, चढणं  म्हणजे विचारांशी लढण असते रे भौ I
लढता लढता पडणं , म्हणजे काय असते रे भौ
लेका , पडणं म्हणजे सवताच्या नजरेतन पडणं असते रे भौ I    
नजरेतन पडणं म्हणजे काय असते रे भौ
लेका, नजरेतन पडणं म्हणजे मनाविरुद्ध उडणं असते रे भौ I
मनाविरुद्ध उडणं म्हणजे काय असते रे भौ
आरं लेका, तेच तर तुला सांगतोय
मनाविरुद्ध उडणं म्हणजे दुसरीकडे चढणं असते रे भौ II
पाटणकर सिद्धेश्वर विलास