कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

shrikant Damle
शब्दार्थ...

व्यक्त होती भाव मनीचे
उमलली शब्दांची अंतरे
सावरती जड तनमने ही
शब्दांनी ही जुळली अंतरे....

अक्षरातुनी व्यक्त होते
अव्ययातील हे बोलणे
शब्दजोड्या जळुनी येती
अर्थातही दडली कारणे....

दाटुन येती भावना ह्या
हुंदक्यानी नयनांचे वाहणे
सरले मनातील शब्द सारे
उरले मुक्यातुन उमजणे....

उलगडे ना गुपित सारे
उसवली शब्द स्पंदने
शब्दशब्दातुनी पाझरे हे
क्रीयापदातील बोलणे....

श्रीकांत...(१३-०८-१५ )