कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

shrikant Damle
मनपाखरु...

भावविश्वात स्वप्नांच्या रंगुन गेलो
हरपले भान माझे नादात स्वरांच्या
विसावलो इंद्रधनुवर नभातल्या मी
पाहीले रंग गहिरे क्षितीजापलिकडले

विहारलो जरा मी तमलोकी कुतूहले
दिपावलो पाहुनी रथ आदित्यरश्मींचा
हुंकारती तेज जिव्हा सप्त सुलोहिनींचे
पाहुनी मनी ॐकाररुप नाद झंकारले

स्नप्नरुप भासे की वास्तव हे सर्वथा
अनुभूतीचे तेज हे अंतरी अवगुंठले
झंकारल्या सप्ततारा मृदुलस्वरांच्या
घेवुनी कवेत क्षितिजा मन पाखरु झाले..

श्रीकांत...(२६-०८-२०१५)